आपले सरकार सेवा केंद्र साठी
-*आवश्यक कागदपत्रांची यादी *-
- पासपोर्ट साईज फोटो
- इयत्ता 12 वी उत्तीर्ण असलेबाबत गुणपत्रक/प्रमाणपत्र,पदवी, पदव्युत्तर उत्तीर्ण असल्यास गुणपत्रक/प्रमाणपत्र (केवळ उत्तीर्ण असल्यास नमुद करावे. पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश असल्यास नमुद करु नये)
- आधार कार्ड प्रत
- पॅन कार्ड प्रत
- Common Service Centre ID Certificate
- ज्या भौगोलिक क्षेत्रासाठी अर्ज करावयाचा आहे, त्या भौगोलिक क्षेत्रात रहिवास असलेबाबतचा पुरावा (आधार कार्ड व्यतिरिक्त खालीलपैकी एक पुरावा जोडावा)
- ग्रामपंचायतीचा दाखला
- तहसिलदार रहिवास प्रमाणपत्र
- मतदार ओळख पत्र
- ग्रामपंचायत/नगरपंचायत/नगरपरिषद महानगरपालिका मालमत्ता पत्रक
- संगणक अर्हता (MS-CIT / CCC)व डिजिटल साक्षरता असल्यास प्रमाणपत्र
- पायाभूत सुविधा -
- स्वमालकीच्या जागेचे शॉप ऍक्ट लायसन्स / मालकी हक्काचा पुरावा (७/१२ किंवा मालमत्ता पत्रक)
किंवा
जागा भाड्याने घेतली असल्यास कायदेशीर नोंदणीकृत भाडे करारनामा किंवा रु. १००/- च्या स्टँम्प पेपरवर करारनामा
- दुकानाचा असा जिओ टॅग फोटो ज्यामध्ये संगणक, प्रिंटर , स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, इंटरनेट, वीज बॅकअप, सीसीटीव्ही इत्यादी बाबी स्पष्ट दिसतील (Interior)
- दुकानाचा असा जिओ टॅग फोटो ज्यामध्ये बाहेर लावलेला मराठीतील नावाचा फलक स्पष्ट दिसेल (दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी सुलभ प्रवेश) (Exterior)
- आर्थिक क्षमता -
- लेखापरीक्षक यांनी प्रमाणित केलेले नेटवर्थ प्रमाणपत्र
- राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा बँकेचे रु. १.०० लक्ष चे सॉलव्हन्सी प्रमाणपत्र
- अनुभव -सी.एस.सी/ सायबर कॅफे / बँक ग्राहक सेवा केंद्र चालवत असलेबाबत संबंधित एजन्सीचे प्रमाणपत्र
- सामाजिक समावेशकता -
- ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेबाबत वैद्यकीय दिव्यंगत्व प्रमाणपत्र (Medical Disability Certificate) किंवा युनिक डिसॅबिलिटी आयडी UDID कार्ड
- माजी सैनिक असलेबाबत Discharge Book / Pension Payment Order ची प्रत
- स्वयंसहायता गटाचे (बचत गट) सदस्य ओळखपत्र, प्रमाणपत्र
- महिला असलेबाबत आधार कार्ड पुरावा
- चारित्र्य पडताळणी - पोलीस विभागाकडील चारित्र्य प्रमाणपत्र (Police Clearance Certificate)