आपले सरकार
आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणेकामी अटी व शर्ती
अटी व शर्ती वाचा
मोबाईल व्हेरीफिकेशन
अर्ज भरा
आवश्यक कागदपत्र जोडा
अटी व शर्ती
अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष असावे व तो किमान 12वी उत्तीर्ण असावा. तसेच अर्जदारास मराठी व इंग्रजी भाषांचे ज्ञान असावे.
आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज हा फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जातील. ऑफलाईन अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ahilyanagar.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. सदर संकेतस्थळावरील लिंक द्वारे बाह्य संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज प्रक्रिया पुर्ण करावी.
आपले सरकार सेवा केंद्र विषयक शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2018, 25 मार्च 2025 व 02 जुन 2025 नुसार सर्व अटी व शर्ती अर्जदारांना लागु असतील. शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2018 मध्ये नमुद आपले सरकार सेवा केंद्र चालकांची कर्तव्ये व जबाबदा-या खालीलप्रमाणे असुन ते अर्जदारांना लागु असतील.
शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केंद्र चालू ठेवून नागरिकांना सेवा पुरविणे.
शासनाने ठरवून दिलेले ब्रँडिंग चा वापर करणे तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने स्थापन केलेल्या हेल्पलाईन क्रमांकाचा तपशील आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे.
शासनाने ठरवून दिलेले दर केंद्रावर प्रसिद्ध करणे तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे.
शासनाने पुरविलेल्या वस्तू, आज्ञावली इ. चे योग्य वापर, संरक्षण व जतन करणे.
सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणूक देणे आणि आवश्यक मदत व सहकार्य करणे.
विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत ठरवून दिलेले वेळापत्रक व निर्देश काटेकोरपणे पाळणे.
पर्यवेक्षीय संस्था, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार माहिती पुरविणे व दिलेल्या निर्देशांचे पालन करणे.
शासन निर्णय दिनांक 11 सप्टेंबर 2019 नुसार पोलीस पडताळणी सादर करणे आवश्यक आहे. सदर अहवाल अर्ज सादर करतांना आवश्यक नाही. तथापि, अर्ज स्विकृतीनंतर पोलीस पडताळणी अहवालाच्या अधीन राहुन आ.स.से.कें. आयडी देणेबाबत निर्णय घेण्यात येईल.
अर्ज करण्यासाठी भौगोलिक क्षेत्र हे प्रथमतः ज्या गावासाठी अर्ज केला आहे ते गाव असेल. अर्जदार हा त्या गावचाच रहिवासी असणे बंधनकारक आहे. तथापि, एखाद्या अपवादात्मक परिस्थितीत रिक्त असलेल्या गावासाठी अर्ज प्राप्त झाला नसेल तर त्या जागेसाठी भौगोलिक क्षेत्र ‘महसुल मंडळ’ गृहित धरण्यात येईल.
महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायत साठी संबंधित संपूर्ण क्षेत्र भौगोलिक क्षेत्र म्हणुन ग्राह्य धरण्यात येईल. तथापि, आयडी प्रदान केल्यानंतर ज्या भाग/प्रभागासाठी अर्ज केला आहे, तेथेच आयडी सुरु ठेवणे क्रमप्राप्त आहे.
अर्जदार हा उपरोक्त नमुद भौगोलिक क्षेत्राचा रहिवासी आहे हे सिध्द करण्यासाठी रहिवास पत्त्याचा पुरावा म्हणुन ग्रामपंचायत दाखला, तहसिलदार रहिवास प्रमाणपत्र, मतदार ओळख पत्र, आधार कार्ड, शिधापत्रिका, ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका मालमत्ता पत्रक इत्यादी पैकी एक पुरावा गृहित धरण्यात येईल.
एका अर्जदाराला केवळ एकाच ठिकाणी अर्ज करता येईल. यापुर्वी आपले सरकार सेवा केंद्र आयडी असलेल्या व्यक्तीस नवीन केंद्रासाठी अर्ज सादर करता येणार नाही. अर्जदाराने एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आल्यास सदर सर्व अर्ज रद्द करण्यात येतील.
शासकीय/निम शासकीय सेवेत असणारे अथवा सार्वजनिक उपक्रम/महामंडळाचे अधिकारी/कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना (पती अथवा पत्नी) आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सादर करता येणार नाही.
विवाहित स्त्रीयांनी अर्ज सादर करतांना नावात बदल असल्यास पुराव्यासह (गॅझेट/विवाह दाखला) अर्ज सादर करावा. विवाहित स्त्रीयांचा रहिवास पुरावा विवाहानंतरचा गृहित धरण्यात येईल.
अर्ज भरण्यासाठी तांत्रिक सहाय्यासाठी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक (DPM), जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व जिल्हा समन्वयक (महा-आयटी), जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांचेशी संपर्क साधावा. इतर त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क साधु नये, तसे निदर्शनास आल्यास अर्ज अपात्र ठरविणेत येईल.
जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांचेकडील अधिसुचना क्र.कार्या/सेतु समिती/149/2025 दिनांक 28/07/2025 अन्वये या जाहिरातीपुर्वी प्राप्त सर्व ऑफलाईन स्वरुपातील प्राप्त अर्ज निकाली ठेवणेत आलेले आहेत. सदर अर्ज या प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नसुन, अर्जदार यांनी नव्याने ऑनलाईन स्वरुपात अर्ज सादर करावेत.
अर्जामध्ये जर चुकीची माहिती नमुद केली असेल तर सदर अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच चुकीची माहिती सादर करणे व शासनाची दिशाभुल केल्याप्रकरणी विहित कलमांनुसार कायदेशीर कारवाई करणेत येईल.
जिल्हाधिकारी यांचे अधिनस्त समितीस अर्ज छाननीबाबत सर्व अधिकार असतील
सदर प्रक्रियेतील प्राप्त अर्जांवर छाननी करुन अर्ज स्विकारणे अथवा नाकारण्याचे अंतिम अधिकार जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांचेकडेस राखुन ठेवण्यात आले आहेत.
आपले सरकार सेवा केंद्र आयडी मिळाल्यानंतर चालकास शासनाचे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडील वेळोवेळी येणारे आदेश मान्य करावे लागतील.
अर्जदारास आपले सरकार सेवा केंद्र मंजुर झाल्यानंतर, ते मंजुर ठिकाणीच चालविणे बंधनकारक आहे. आपले सरकार सेवा केंद्राचे मंजुर ठिकाण मा.जिल्हाधिकारी यांचे परवानगीशिवाय बदलता येणार नाही. तसे केल्यास संबंधीत आपले सरकार सेवा केंद्र कायमस्वरुपी बंद करणेत येईल.
आपले सरकार सेवा केंद्र चालकास आयडी मंजुर झाल्यानंतर हस्तांतरित करता येणार नाही. तसे निदर्शनास आल्यास सदर आयडी रद्द करण्यात येईल.
शासनाच्या सर्व सेवा, लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसुचित केलेल्या सर्व सेवा व शासनाने वेळोवेळी नवीन धोरणांनुसार निर्गमित केलेल्या सेवा आपले सरकार सेवा केंद्रातून देणे अनिवार्य राहील.
प्राप्त अर्जांची छाननी शासन निर्णय दिनांक 02 जुन 2025 मधील नमुद गुणांकन पध्दतीनुसार सेतू प्रभारी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक (DPM), जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर हे संयुक्तरीत्या पार पाडतील.
शासन निर्णय दिनांक 02 जुन 2025 मध्ये नमुद असलेप्रमाणे एका भौगोलिक क्षेत्रासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 20 गुणांची मुलाखत घेणे आवश्यक आहे. तथापि, एकावेळी मुलाखत प्रक्रिया राबविणे शक्य नसल्याने जिल्हा सेतु समितीच्या दिनांक 23 सप्टेंबर 2025 च्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल व एकूण प्राप्त गुणांचे रुपांतरण 20 पैकी गुणांमध्ये करुन अंतिम निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
छाननी प्रक्रियेनंतर आयडी प्राप्त झाल्यावर आपले सरकार सेवा केंद्र चालकाने 2 महिन्यांच्या आत केंद्र सुरु करावे. अन्यथा सदर केंद्र रद्द करण्यात येईल. तसेच आयडी प्राप्त झाल्यावर सदर आयडीवरुन 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत व्यवहार न झाल्यास सदर आयडी कायमस्वरुपी बंद करण्यात येईल.
शासन निर्णय 19 जानेवारी 2018 नुसार आपले सरकार सेवा केंद्राचे बॅनर (परिशिष्ट ड), तसेच केंद्रामार्फत देणेत येणा-या सेवा (परिशिष्ट क), लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत मोफत अपिल बाबत फलक दर्शनी भागात लावणे, सेवानिहाय रेट चार्ट दर्शनी भागात लावणे आवश्यक राहिल. तसेच नागरिकांसाठी बसण्याची सोय व आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करावी लागेल.
संबंधित उप विभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच केंद्राबाबत माहिती/अहवाल मागविल्यास तात्काळ सादर करावा लागेल. VLE MIS अहवाल दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत उप विभागीय अधिकारी यांचेकडेस सादर करणे बंधनकारक राहील.
सर्व प्रकारचे डिजिटल पेमेंटला प्राधान्य दयावे लागेल.
शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केंद्र सुरु ठेवावे लागेल.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांनी नियुक्त केलेला तांत्रिक अधिकारी हे आपले सरकार सेवा केंद्र ची संपूर्ण चौकशी करु शकतील.
नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालय अथवा क्षेत्रीय कार्यालयात तक्रार आल्यास, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिप्राय कक्षात तक्रार प्राप्त झाल्यास आपले सरकार सेवा केंद्राची चौकशी करुन त्यावर कारवाई करणेत येईल.
आपले सरकार सेवा केंद्राकरीता कोणत्याही शासकीय परिसरामध्ये जागा मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
नगरपरिषद /नगरपंचायत भागात संबधीत तहसिलदार हे प्रभागनिहाय केंद्र निश्चित करुन देतील व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना ते बंधनकारक राहील.
जाहिरातीमध्ये नमुद रिक्त जागांमध्ये ज्या गावांची नावे नमुद नाहीत, अशा ठिकाणी लोकसंख्येच्या निकषानुसार आपले सरकार सेवा केंद्र यापुर्वीच उपलब्ध असल्याने अशी गावे नमुद केलेली नाहीत.
रिक्त जागांची माहिती महा-आयटी कडील डाटा नुसार प्रत्येक गावनिहाय मॅप करुन तयार करण्यात आलेली आहेत. सदर जागांमध्ये कमी-अधिक असा बदल करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांचे असतील. तसेच रिक्त जागांबाबत आक्षेप असल्यास, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक (DPM), जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व जिल्हा सेतु समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांचे कार्यालयात लेखी अर्ज करावा.
अर्ज प्रणालीबाबत तांत्रिक तक्रारी असल्यास अथवा सेतु केंद्र देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील किंवा इतर त्रयस्थ व्यक्तीने पैशाची मागणी केल्यास अथवा सदर प्रक्रियेबाबत इतर कोणत्याही स्वरुपाच्या तक्रारी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ‘अभिप्राय कक्ष’ येथे 0241-2310061 या क्रमांकावर तक्रार दाखल करावी.
वरील सर्व अटी व शर्ती अर्जदार/केंद्र चालक यांच्यावर बंधनकारक असून याबाबत भविष्यात अर्जदार/ केंद्र चालक यांची कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.
आपले सरकार सेवा केंद्र मंजुरीबाबतचा अंतिम अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा सेतु समिती, अहिल्यानगर यांचेकडेस राखून ठेवलेला आहे.
संपुर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्जदारांनी वेळोवेळी https://ahilyanagar.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर सुचना/निर्देश बघावे, या संदर्भात या कार्यालयाकडून स्वतंत्र पत्र व्यवहार केला जाणार नाही किंवा भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
नागरिकांची माहिती पोर्टलवर भरतेवेळी संबंधित अर्जदार याचा मोबाईल क्रमांक नमुद करणे अनिवार्य आहे. जेणेकरुन नागरिकांना त्याच्या अर्जाची प्रत्येक टप्प्यावरील माहिती अवगत होईल.
अर्जदार यांनी ऑनलाईन अर्ज दाखल करतांना अटी व शर्तींचे काळजीपुर्वक वाचन करुन अर्ज दाखल करावा. अर्ज अपात्र/बाद झाल्यास दुरुस्तीची संधी दिली जाणार नाही.
आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देणेबाबत रु.100/- इतके अर्ज शुल्क लागु आहे. याव्यतिरिक्त अर्जदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अथवा इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तींशी/एजंटशी आर्थिक व्यवहार करु नये.
अर्जदार यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर ऑनलाईन अर्ज व समवेतच्या कागदपत्रांची एक प्रत छाननीकामी संबंधित उप विभागीय अधिकारी यांचेकडेस जमा करावी.
वरील सर्व अटी आणि शर्ती मान्य आहे
नोंदणी करा